Alumini

Last updated on September 5th, 2023 at 11:43 am

Alumni

About Alumni

TANTRASHIKSHAN MITRA ALUMNI WELFARE ASSOCIATION BRAMHAPURI

TANTRASHIKSHAN MITRA ALUMNI WELFARE ASSOCIATION is the Alumni Welfare Association of Government Polytechnic Bramhapuri whose main aim is to provide platform to all the past students to meet again. It also provides platform to express their views to the new upcoming students who will enter in the actual life of race. It is also the platform where institution can enrich with alumni experience.It provides opportunity to share sweet memories with old friends and colleague to interact as well as to maintain lifetime ties among them.

OBJECTIVES OF ALUMNI ASSOCIATION
  • To increase no. of members of the association and arrange the meet.
  • To provide platform to the past student to meet again on single platform to remember their past and share their thoughts, ideas and experience.
  • To provide guidance for job, business, competitive examination to the students.
  • To provide proper guidance to the student who are in sport.
  • To arrange YOGA camp, Blood Donation Camp, Health Check up Camp in Collage.
  • To provide advantage of alumni knowledge and experience to current student
EXECUTIVE COMMITTEE
  •   Dr. Manoj Daigavane,   Principal and President
  • Shri D. M. Gadhave,   Vice President
  •   Shri J. D. Borkar,   Jt. Secretary
  • Shri M. T. Gajbhiye,   Treasurer
  • Smt. S. I. Bansod,   Member
  • Smt. A. A. Raipure,   Member and Alumni
  • Shri S. N. Bengal,   Member
  • Shri P. B. Chauke,   Member

Few Words from Alumni


नाव - साजन शा. शेंडे
शिक्षण हे मानवी जीवनाचा पाया, जीवनातील अतिशय महत्वाचा घटक, प्रत्येक क्षेत्रातील स्पर्धैत टिकून राहण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी, एका योग्य प्राप्तीनंतर, माझ्याकडून इतरांच्या अनेक अपेक्षापुर्ती करण्यासाठी लागणा~या ब~याच गुणांचा पायाभुत भडिमार करून माझ्यांत सर्वांगीण विकास करण्याचं धाडस भरण्याचं कार्य, केलेली संस्था म्हणजे “शासकीय तंत्र निकेतन ब्रम्हपुरी.”

शैक्षणिक संस्था म्हणजे फक्त दगडमातीच्या भिंती नसून विद्यार्थ्यांचे स्वप्न पुर्ण करणारे मंदिर असते. ‘तंत्र निकेतन ब्रम्हपुरी’ म्हणजे असे ठिकाण की, जिथे तारूण्याकडे जातांना जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सर्वार्थाने तांत्रिकदृष्टया तयार झाला. तंत्र निकेतन मध्ये जावून व्यक्ती फक्त अभ्यासच करतो, असे नाही तर माझ्या मनात जीवनाबद्दल एक सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला. बाहेरच्या विश्वात भरारी मारण्यासाठी माझ्या पंखांना बळ मिळालं ते इथूनच. “बचपन मे मीला प्रशिक्षण ही बालक को युगपुरूष बनाता है|” याची प्रचिती झाली.

संस्थेने माझ्यामध्ये घडविलेले बदल, गुरूजनांचे मौल्यवान मार्गदर्शन, माझ्या व्यक्तीमत्वाची जडणघडण, सारं अव्यक्त होण्यापलिकडील. इथून बाहेर पडलो व बाहेरच्या विश्वाशी समरस झालो परंतू यातील संस्थेचा परिसस्पर्श कधीही विस्मरणात गेलेला नाही. मी आज जो काही आहे याची खरी पायाभरणी “शासकीय तंत्र निकेतन ब्रम्हपुरी” येथे झाली याचा मला गर्व आहे.

ज्यावेळेस राज्यमहामार्गावरून माझ्या परिवहन विभागाच्या कामानिमित्त जातांना महामार्गावरून शासकिय तंत्र निकेतन ब्रम्हपुरीच्या आजच्या इमारतीचे दर्शन घडते तेव्हा जणू असे वाटते की, या मंदीराच्या पायरीवर माथा टेकवून नतमस्तक होवून कृतकृत्य व्हावे. आज मनोगत लिहीतांना येथे व्यतीत केलेल्या कडूगोड आठवणींचा मुरंबा गोड वाटायला लागला. संस्थेच्या प्रकाशीत होत असलेल्या अद्यायवत वेबसाईटला माझ्या मनपुर्वक शुभेच्छा !

साजन शा. शेंडे


नाव - अभय रमेश भागवत शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी ( यांत्रिकी ) बॅच - 1990 - 1993 पत्ता - भंडारा पद - मॅनॅजिंग डायरेक्टर ऑफिस - प्रिया स्टिल इंडस्ट्रीज भंडारा बालाजी फर्निचर, भंडारा मॅप फर्निटेक प्रा. ली. नागपुर
नमस्कार मित्रांनो....... शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी चे माननिय प्राचार्य, उपप्राचार्य व संपूर्ण शिक्षक वृंद आणि इतर सर्व कर्मचारी सगळ्यांना नमस्कार. मी आपल्या कॉलेज चा विद्यार्थी राहिलो आहे. आज देखील कॉलेज चे नाव बोलण्यात किंवा ऐकण्यात आले की मनात सार्थ अभिमान वाटतो की आपण ह्या कॉलेज चे विद्यार्थी आहोत. या कॉलेज मधून मी यांत्रिकी इंजिनीरिंग ची पदवीका घेतली आहे. प्रदीर्घ वेळ लोटला आहे. तरीदेखील आजही असे प्रकर्षाने जाणवते की कॉलेज मधून बाहेर पडून, जेव्हा आपण पुढील आयुष्याची वाटचाल करतो तेव्हा या ज्ञानमंदिराची पदोपदी आठवण होत असते. शिक्षण पूर्ण झाल्यावरही त्या काळात आम्हाला मिळालेले मार्गदर्शन कायमच अतुलनीय साथ देते. प्रत्येक विद्यार्थी आयुष्याची दिशा ठरवून कॉलेज मध्ये प्रवेश करतो, आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी याच ठिकाणापासून वाटचाल करतो. आपले आईवडिलांचे घर जसे आपल्या हृदयात हळवे आणि मोलाचे स्थान व्यापून असते तसेच हे कॉलेज सुद्धा मनात अनमोल स्थान राखून आहे. येथील अनेक उत्तम आठवणी आजदेखील ताज्या आहेत. आमच्या सोबतचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. कितीतरी इंजिनिअर उच्च पदावर पोहचले आहेत. देशात, विदेशात आपल्या कॉलेज चे विद्यार्थी नाव कमवत आहेत. कुठल्याही क्षेत्रात कामगिरी केली तरी व्यक्ती म्हणून देखील समाजात प्रभावी व्यक्तित्व साकारले पाहिजे. फक्त शिक्षणच नव्हे तर सोबत संपूर्ण व्यक्तिमत्व प्रगल्भ झाले तर व्यक्तीच्या यशा सोबत ती व्यक्ती मानसन्मान मिळवते आणि लोकप्रिय ही ठरते. असे कितीतरी उच्च पदस्थ अधिकारी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व कॉलेज ने घडविले आहेत. येथील अद्ययावत शिक्षकवृंद विद्यार्थ्यांना घडविण्यास तसेच मार्गदर्शन करण्यास नेहमीच तत्पर असतात. कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतांना आम्हाला अभ्यासा सोबतच शिस्त, सामाजिक ज्ञान, नैतिक मूल्ये, मोठ्यांचा मानसन्मान, संस्कार यांचे बाळकडू येथूनच मिळाले. आपल्याला जीवनात आपली आई जितकी महत्वाची असते तितकेच महत्वाचे शाळा आणि कॉलेज असतात. कॉलेज मध्ये आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा काळ व्यतीत होतो. माझ्या शैक्षणिक आयुष्याचा मोलाचा पाया या कॉलेज मध्येच घातला गेला. आज जेही काही मी घडलो आहे त्याची पायाभरणी इथूनच झाली. माझ्या उत्कर्षामध्ये शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी या आपल्या कॉलेज चे महत्वाचे स्थान आहे. या ज्ञानमंदिरातून अनेक विद्यार्थी उत्तम यश घेऊन बाहेर पडले आहेत आणि याच मार्गातून उत्तुंग प्रगती करत यशाची उंच उंच शिखरे सर करीत आहेत. कॉलेज बद्दल सांगायला शब्द अपूर्ण पडतात. एखादी चांगली आठवण येथे लिहायची झाल्यास मागील वर्षी ची अलुमिनि मीट ही अविस्मरणीय होती अनेक वर्ष्याच्या प्रदीर्घ कालावधी नंतर माझ्या गुरुजनांना आणी माझ्या सोबत शिकलेल्या तसेच इतर विद्यार्थी मित्रांना भेटुन एक नवी ऊर्जा प्राप्त झाली. काळानुरूप शिक्षण पद्धतीत बदल करून कॉलेज ने नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे, हे बघून नक्कीच आनंद होतो. उत्तरोत्तर कॉलेज ची प्रगती होत राहील यासाठी मी सदिच्छा व्यक्त करतो. येथील विद्यार्थी हा उत्तम नागरिक आणि प्रगतशील व्यक्ती म्हणून नावाजला जाईल अशी आशा व्यक्त करतो. माझ्या अनेक सदिच्छा नेहमी कॉलेज साठी आणी येणाऱ्या पुढील अभियंता साठी आहेतच. माझे मार्गदर्शन कधीही कुणाही भावी पिढीतील विद्यार्थ्यांना लागल्यास मी सदैव तत्पर असेल. आज ही येथील सर्व शिक्षक वृंद, आणि शिक्षकेतर कर्मचारी कॉलेज च्या प्रगतीसाठी कृतिशील, कार्यशील आहेत. अनेक अनेक यशवंत विद्यार्थी येथून निर्माण होतील याची मला पूर्ण खात्री आहे. शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरी या महाविद्यालयाला माझे शतश: नमन!! प्रगतीचे अनेक दिवे विश्वात आम्ही पेटवितो हृदयातील ऋणानुबंध मला कॉलेजचा आधारस्तंभ दाखवितो.......

आपला स्नेहांकित
अभय रमेश भागवत


CEr. यामिनी उमेश बदकी (पूर्वीचे नाव: योगिता वा. चव्हाण ). राजपत्रित अधिकारी वर्ग 1, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन
………स्थापत्य अभियंत्याचे जागतिक स्तरावरील योगदान..... एकदा एका व्यक्तीने असा प्रश्न विचारला, की या जगामध्ये सर्वात जबाबदार असा कोण आहे, तेव्हा बऱ्याच लोकांनी खूप विचार केल्यानंतर असे सांगितले की, असा एकच व्यक्ती आहे की, ज्याच्यावर सर्वांची जबाबदारी आहे तो म्हणजे डॉक्टर... परंतु नंतर बराच विचार केल्यानंतर असे जाणवले की डॉक्टर एका वेळेस एका व्यक्तीवर शस्त्रक्रिया करू शकतो किंवा त्याला उपचार देऊ शकतो. त्याच्या एका चुकीमुळे एका वेळेस एक व्यक्ती मृत्यू पावतो. परंतु असा आणखी एक समाजातील घटक आहे, जो 'स्थापत्य अभियंता' म्हणून गणला जातो. आणि या प्रश्नाचं खरं उत्तर हे 'स्थापत्य अभियंता' हेच होतं. तुम्ही विचार करू शकता की या जगामध्ये जो काही बदल घडलाय, आपण आदिमानवापासून सुरुवात केलेली आहे. पूर्वी आपणास राहण्यासाठी केवळ झोपड्यांचा आधार घ्यावा लागत होता. नंतर हळूहळू मानवाने घरांच्या निर्मितीमधील कौशल्य विकसित करून चांगल्या प्रतीचे घरे जी भूकंपाचे धक्के सुद्धा सहन करू शकतील व विविध तापमानातील बदल सहन करू शकेल व विविध उंचीचे ठिकाणी गाठू शकेल असे निर्माण केले. आपण ज्या रस्त्यांवरून वेगवेगळ्या ठिकाणी जातो, ज्या वेगवेगळ्या दळणवळणाचा (रस्ते, पूल, बंदरे, बोगदे, डॉक्स, विमानाच्या धावपट्ट्या, डोंगरावरील रस्ते, भुयारातील रस्ते, हवेत तरंगणारे उड्डाणपूल, सस्पेन्शन ब्रिज, पाण्यातील मार्ग, पाण्यावर तरंगणारे जहाजे, पाण्यातून होणारी जलवाहतूक असे आणखी बरेच काही) मी तुमच्या माहितीसाठी एक उदाहरण देते की, एखाद्या स्थापत्य अभियंत्याने एखाद्या धरणाचे (dam)जर चुकीचे संकल्पन केले किंवा त्याची निर्मिती करताना अभियंत्याकडून काही चुका झाल्या तर ते धरण भूकंपात किंवा पुरामध्ये जर पडले तर एका क्षणामध्ये लाखो जीव जाऊ शकतात किंवा फार मोठा धोका होऊ शकतो. त्यामुळे तुम्हीच सांगा की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ स्थापत्य अभियंता आहे का दुसरं कोणी आहे. तसेच तुम्ही आणखी असा विचार करा की, जर रस्ते, विशिष्ट दर्जाचे पूल, भूमिगत रस्ते, पर्वतांवर जाणारे रस्ते, रेल्वे मार्ग जर तयारच झाले नसते तर तुम्ही कमी वेळेमध्ये इच्छित ठिकाण गाठू शकला असता का आणि आपली प्रगती होऊ शकली असती का. तसेच आपण दिवसभर काम केल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी व कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी म्हणजे एकंदरीत आपल्या आयुष्यातील 75% वास्तव्य, ज्या घरांमध्ये राहतो, इमारतीमध्ये राहतो, त्याचे संपूर्ण संकल्पन व निर्माण हे केवळ स्थापत्य अभियंत्यामुळे शक्य झाले आहे. तसेच या देशातील कोणत्याही उद्योगास किंवा अन्य उद्योग सेवा असुद्या, त्याच्यासाठी सर्वप्रथम निवास अथवा कार्यालयाची आवश्यकता असते, ज्याचे नियोजन व बांधकाम हे स्थापत्य अभियंत्याचे मार्गदर्शन घेतल्याशिवाय पुढे काहीच करता येत नाही. आता यापुढे मी आणखी उदाहरणे देत नाही, तुम्ही सुज्ञ नागरिक आहात. तुम्हीच विचार करा ही जिथे जिथे तुम्हाला काही नवीन सुरु करायचे आहे, तिथे तुम्हाला स्थापत्य अभियंत्याची मदत व मार्गदर्शन घेतल्या शिवाय पुढे काहीच होऊ शकत नाही. एकंदरीत सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्ही असे समजा की, जर स्थापत्य अभियंते नसते तर, दवाखान्याचे इमारती, कार्यालयाची बांधकामे, कारखाने व उद्योगधंद्यांसाठी आवश्यक दळणवळण यंत्रणा, माणसाच्या दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे वीज, पाणी इत्यादी साठी आवश्यक असणारे प्रकल्प होऊच शकले नसते अथवा झालेच नसते, तर माणसाची प्रगती झाली असती का.... त्यामुळे माझे या देशातील प्रत्येक स्थापत्य अभियंत्यास अशी विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या नावासमोर CEr असे लिहावे. CEr म्हणजे सिव्हिल इंजिनिअर.. अश्या मला व माझ्या सारख्या अनेक जबाबदार स्थापत्य अभियंता घडवणाऱ्या, शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरी या संस्थेस माझे मनापासून धन्यवाद, मानाचा मुजरा ......तसेच मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार ......

धन्यवाद...!!!!


Ashwini Abaji Raipure Government Polytechnic, Bramhapuri Branch: Information Technology Batch : 2001-2003 Post: Lecturer (Class-1 Gazetted) Higher and Technical Education Department, Government of Maharashtra.
Dear Friends....
It is really an honour for me that I am getting a chance to write my testimony for the institute which is far above a temple for me. This institute made me capable to find the best in me. In fact the guidance and everything I got here changed my way of thinking, my role models and finally my goals. There are many good as well as bad experiences in everyone’s college life, I also had many. But I can assure you that Government Polytechnic Bramhapuri is the only place where you are taught to be calm. What I learnt throughout my college life as per the guidance of my respected teachers is that strives for the victory but don’t lose your mind during defeat, fight back and be a phoenix. Therefore I think it’s the institute which made me capable of handling real life situations. Government Polytechnic Bramhapuri gave me a new life. Thank you my institute for making me what I am today. It is evidential that Government Polytechnic Bramhapuri is also evolving with the race to time, I am really very happy to be conversant with that. Thank You!

Alumni Registration










Examination Time Table